मतीविना निती गेली
नितीविना गती गेली
गतीविना वित्त गेले
वित्ताविना शुद्र खचले
एव्हडे अनर्थ एका अविद्धे केले
शिक्षणाचे महत्व एव्हड्या सध्या आणि सोप्या भाषेत सांगणारे, केवळ महत्व सांगूनच न थांबणारे , त्याप्रमाणे शुद्रांसाठी, आणि सर्वच समाजातील स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडे करणारे या देशातील खरे खुरे महात्मा फुले यांचा आज स्मृतिदिन ! खरे तर बहुजन समाजावर महात्मा फुलेंनी केलेले उपकार फार मोठे आहेत… त्यामुळे बहुजनांनी मोठ्या प्रमाणात हा दिवस साजरा करायला हवा होता, किमान या दिवशी तरी चिंतन करायला हवे होते, ज्या पुण्यात या महात्म्याने सावित्रीमाईच्या साथीने शिक्षणाची द्वारे सर्वांसाठी खुली केली त्या पुण्याने मात्र शिक्षणाचे देवत्व काल्पनिक प्रतिमेला दिले, शिक्षणाचे माहेर घर म्हटल्या जणा-या या शहरात महात्मा फुलेनीच ज्ञान ज्योत लावली … पण बहुजन त्यांना विसरून कामधंदा सोडून हात पायाचा टाळ करून, घशाचा मृदुंग करत , गळ्यात अंधश्रद्धेचा फास लटकवून, खांद्यावर परंपरेची विना घेवून, भांवनांचा गजर करीत चमत्काराला नमस्कार करण्यासाठी भलतीकडेच जाताना दिसत आहेत … !!!! असो.
बहुजन समाज मोठ्या प्रमाणात शाळांमध्ये जाऊ लागला आहे, सरकारी नोक-यांमध्ये दिसत आहे, विविध क्षेत्रांमध्ये डोकावत आहे, एकंदर बहुजन समाजाला तुलनेत चांगले दिवस आले आहेत, महिला सर्वच क्षेत्रांत पुढे येत आहेत ही सारी महात्मा फुले यांनी घेतलेल्या परिश्रमाची फळे आहेत. पण खरेच बहुजन समाज शिक्षित झाला आहे का ? विध्यार्थी झाला आहे का ? विद्ध्यावान ( विद्वान ) झाला आहे का ? काही मोजके बहुजन सोडले तर बहुसंख्य साक्षरच आजूबाजूला दिसतात. केवळ साक्षरता हे महात्मा फुलेंचे उद्धिष्टः नव्हते, तर सा-यांनी ज्ञानी व्हावे हे होते आणि ज्ञानी कशासाठी व्हायचे तर सर्वांगीण विकासासाठी , कुणीही खचून न जाण्यासाठी, सर्वांना एक चांगले जीवन जगता येण्यासाठी, अंधश्रद्धा, मनुवादी परंपरा मोडीत काढण्यासाठी, राष्ट्रीय एकात्मतेसाठी !!!! पण आज केवळ साक्षरांचीच संख्या जास्त दिसत आहे …मतीचा थांग पत्ता नाही त्यामुळे नीतीचा प्रश्नच नाही। कुणी स्वतःच्या मुलीचे लैंगिक शोषण करीत आहे कुणी म्हातारीचे … एव्हडेच नाही तर आता बकरी आणि कुत्रेही सुटत नाहीयेत…नितीच नाही तर गती कशी राहील… चाललाय देश खाली खाली आणि मग वित्त ? तेही चाललेय खाली खाली ….रुपयाचे अवमुल्यन होत आहे मग यामुळे बहुजन खचत आहेत। त्यांच्या शोषणात भर पडत आहे … कांदा वाढला… पेट्रोल वाढले … खत वाढले… बेरोजगारी वाढली आणि हत्या आत्महत्त्या वाढल्या… शेटजी भटजींची पोटंही वाढली … आणि खचून गेलेले बहुजन मग पुन्हा मनूच्या तावडीत सापडले …!!!!
१९ व्या शतकात फुलेंनी जे ओळखले होते ते २१ व्या शतकातही लागू होत आहे !!!!
सरकारने तर महात्मा फुलेंना भाजी मंडईवाला बनवून टाकले आहे , फुले माळी समाजात जन्माला आले याचा मळ्यांना कधी कधी अभिमान वाटतो पण त्यांची तत्वे पाळायची म्हटले या माळ्यांचा भोपळा फुटतो । फुलेंनी महारांसाठी काम केले असेही ही मंडळी म्हणायला मागे पुढे पाहत नाही, हा निव्वळ साक्षरतेचा परिणाम आहे. फुलेंनी फक्त महारासाठीच काम केले का ? फुलेंच्या पहिल्या महिला शाळेत ब्राह्मण महिला शिकल्या, ब्राह्मण स्त्रियांना आधार द्यायचे काम या दाम्पत्याने केले एव्हढेच नव्हे तर सा-याच बहुजनांना शाळा शिकविली… !!!
आजच्या दिनामिनित्त बहुजनांनी या बद्धल चिंतन करायला हवे, वेळीच जागे व्हायला हवे परंपरांचे जुनाट जू फेकून दिले पाहिजे । नाही तर भविष्यकाळ कठीण आहे… !!!!
No comments:
Post a Comment