Thursday, April 21, 2011

कोंकणी माणसाची नस

कोंकणी माणसाची नस
दाखवत होता फणस
काटे दिसती अंग भर
परी आत गरेभर रस
राजकारण येता मध्ये हे
उगा झडतो बुद्धीचा कस
बदलत चालली ओळख ही
बदनाम होतोय फणस
                       --- हट्टी कवी  
 
 
 

Tuesday, April 5, 2011

मी भ्रष्टाचार करीत नाही ........ !

मी भ्रष्टाचार कधी करीत नाही
कारण मला संधी मिळत  नाही
एकदा संधी देऊनच  पहा
या क्षेत्रातही मला अजमावून पहा
तुम्हाला मी कधी विसरणार नाही
कारण सोन्याचे अंडी देणारी कोंबडी
शहाणा कधी कापत नाही
पैसा केला फार तर ओरडू नका उगा
जगाची रीतच आहे ही
कपड्याखाली जो तो नंगा
                        _____ हट्टी कवी