Tuesday, March 19, 2013

आयुष्यभर जेव्हडे पिले आणी सोडले तेव्हडे एका दिवसात काही मिनिटात वाया घालवले


माणूस दिवसाला सरासरी १.५ लिटर लघवी करतो , याचा अर्थ  तो ७ २ वर्षाचा होई पर्यंत ३ ९ ४ २ ० लिटर अनावश्यक पाणी लघवी च्या माधमातून बाहेर टाकतो वयाची ७ २  वर्ष पार केलेल्या या बापूने एका कार्यक्रमातच एव्हडे पिण्यायोग्य पाणी वाया  घालवले …मुंबईतल्या कार्यक्रमातही हजारो लिटर पाणी वाया घालवले …त्याचा अधिकृत आकडा  माहित व्हायचा आहे …. माणूस दिवसाला सरासरी ५ लिटर पाणी पितो म्हणजे १ ३ १ ४ ० ०  लिटर  पाणी  तो ७ २ वर्षाचा होई पर्यंत पितो …. नागपूर आणि मुंबई मधला आकडा मिळवला तर बापूने आयुष्यभर जेव्हडे पिले आणी सोडले तेव्हडे एका दिवसात काही मिनिटात वाया घालवले …. मग विचार आपल्या मनाला … कसे हानावे या बापूला …. 

Monday, March 18, 2013

असा ह राम बापू


महाराष्ट्रात दुष्काळ आहे … अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रात पाण्यासाठी हाहाकार उडालेला आहे आणि याच काळात आसाराम बापू हरामगिरी दाखवत आहे. नागपूर येथे चाळीस हजार लिटर पाण्याचा वापर होळी खेळण्यासाठी त्याने केला आणि त्यानंतर अश्याप्रकारच्या कार्यक्रमाला बंदी असतानाही त्याने मुंबईतही पाण्याची अशीच होळी केली , असा ह राम बापू किती असंवेदनशील आहे हे वेलोवेळी दिसलेच आहे … याच्या मुसक्या आवळून पाण्याशीवाय  ठेवायला पाहिजे म्हणजे त्याला पाण्याची किंमत कळेल…. सर्वच राजकीय पक्षांनी या हरम्खोरीचा निषेध  केला हे फारच योग्य अहे… परंतु नुसता निषेध करून चालणार नाही … अशा बापू टापुन्ना कायमचे हद्दपार करायला हवे … 


Friday, March 15, 2013

चमचोंसे ना उलझो . . . !
साथीयों . . . !
सप्रेम जयभीम !
भारत देशात सुरु असलेला मनु विरुद्ध मानव, अल्पजन विरुद्ध बहुजन, गांधी विरुद्ध आंबेडकर हा संघर्ष अद्याप संपलेला नाही, उलट तो नवे नवे स्वरुप घेत चिघळतच चालला आहे. आपण मानवतावाद म्हणजेच आंबेडकरवाद म्हणजेच समानतावादाचे शिपाई आहोत. आपल्या घरी पुस्तकांची कपाटं आहेत, आपण पुस्तकं वाचलीही आहेत त्यांच्या घरी ही कपाटं नाहीत, त्यांनी मनुस्मृती वाचलीही नाही परंतु विदारक सत्य हे आहे की, न  वाचताही मनु त्यांच्या मनात घर करुन बसलेला आहे. अशी डोकी कमी असली तरी त्यांचाच जोर आज देशात दिसतो याचं कारण आपण कमी पडत आहोत त्यामुळे ही कमी डोकी बहुजनांच्या असंख्य डोक्यांना हाताळत आहेत. त्यासाठी आपल्याला मोठ्या कौशल्याने आणखी जोर लावावा लागेल, अन्यथा शब्द बापुडे केवळ वारा बनून राहातील ! बहुजन नायक मा. कांशिरामसाहेबांच्या यांनी ही कौशल्य आपल्याला वेळोवेळी सांगितली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे की, ü जर तुम्हाला एखाद्या विचारकाचे विचार दिर्घकाळ जीवंत ठेवायचे असतील तर त्यांचा प्रचार, प्रसार निरंतर झाला पाहिजे. आपल्याला महामानवांचे विचार जीवंत ठेवायचे आहेत, या महामानवांच्या स्वप्नातील भारत बनवायचा आहे त्यासाठी मनूला हद्दपार करावंच लागेल.
डॉ. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले, सुर्य अस्ताला गेला. या देशातील शोषित बहुजन अंधाराच्या खाईत लोटले गेले.  अशावेळी अंधारातही सुर्याचे तेज वाहणारा चंद्र उदयास आला. मा. कांशिरामसाहेबांच्या रुपाने ! ज्या काळात बाबासाहेब हे केवळ एका जातीतच बंदिस्त करुन ठेवण्यात आले होते,जयंती पुण्यतीथी पुरतेच मर्यादित ठेवण्यात आले होते त्याकाळात मा.साहेबांनी बाबासाहेबांचे खरे विशाल दर्शन साऱ्या जगाला घडवून दिले. त्यानंतर फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीला नवी गती, नवी दिशा प्राप्त झाली. मृतावस्तेत असलेली चळवळ त्यांनी जीवंत केली. त्यावेळी देशात बाबासाहेबांचा विचार ठिक आहे परंतु त्याच्यामुळे सत्ता मिळत नाही अशा प्रकारची लहर निर्माण झाली होती, परंतु  साहेबांनी या विचारानेच सत्ता मिळते, हे दाखवून दिले. पंजाब, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश यासह देशभरात  ठिकाणी ‘होऊ शकते भाई - होऊ शकते !’ अशी नवी लहर निर्माण झाली. कांशिरामसाहेबांनंतर आता पून्हा  ‘होऊ शकत नाहीची’ लहर निर्माण होऊ नये यासाठी जोर लावणे गरजेचे आहे.
कोणतीही चळवळ ही गतीमान न राहाता स्थिरावली की ती केवळ वळवळ बनून राहाते साहेबांनीही याकडे आपले लक्ष वेधले होते आता ही चळवळ पूर्णपणे स्थीरावली असे म्हणता येत नसले तरी ती पूर्णपणे गतिमान आहे असेही म्हणता येत नाही. जी थोडीफार गती आहे तेही वेगवेगळ्या दिनांच्या औचित्यानेच दिसून येत आहे. विविध ठिकाणी होत असलेले कार्यक्रम, चालविले जाणारे उपक्रम त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून 2014 मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिमुळे  काँग्रेस आणि बीजेपीचे लक्ष वेधले गेलेले आहे. आपल्या समाज चळवळीला काँग्रेस नावाची लष्करी अळी बाबासाहेबांच्या काळापासून लागलेली आहे. ती एकदम हल्ला करुन आपल्या साऱ्या मेहनतीवर पाणी फेरते. त्याच्या सोबतीला आताच्या काळात भाजपा, आरएसएस हे नाकतोडे आपली शेती नष्ट करण्यासाठी घुसलेले आहेत. याशिवाय बारीक बारीक किडे माकोडे आहेत ते वेगळेच या साऱ्यांमुळे आपल्या सारख्या शेतकऱ्याने मेहनतीने केलेली शेती नाश पावते व शेवटी शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते. विशेष म्हणजे या अळ्यांनी, किड्या माकोड्यांनी आपले कोष आपल्याच शेतात बनविलेले आपण पाहात आलेलो आहोत. हे कोष म्हणजे समाजाचे दलाल आहेत. साहेब यांचाच उल्लेख चमचा असे करायचे.
विविध स्तरावर हे चमचे आहेत, ते बाबासाहेबांच्या काळात होते, कांशिराम साहेबांच्या काळातही होते व आजची आहेत याचे कारण हे चमचे हाताळणारे हात कायम आहेत. कांशिरामसाहेबांनी चमच्यांवर प्रहार करण्यात ताकद खर्च न करता चमचाधारी हातावर प्रहार करा असा संदेश दिला होता. तो आजही आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आज चमचे केवळ राजकीय क्षेत्रातच नसून त्यांचे क्षेत्र विस्तारलेले आहे . सामाजीक, सांस्कृतीक, शासकीय, आर्थिक, उद्योजकीय, कला अशा विविध क्षेत्रात पद, प्रतिष्ठा, पैसा यांच्या मागे लागून ते वावरत आहेत, आपल्याला त्यांना वेळीच ओळखून त्यांपासून सावध राहायला हवे. आजही आपण पाहतो आपला 70 टक्के  वेळ हा आपल्यातील चमच्यांवर प्रहार करण्यातच खर्च होत आहे, आणि अगदी हेच मनुवाद्यांना अपेक्षीत आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहायलाच हवे. Divide and Rule हे तत्व वापरले जात आहे.
आपल्याला देशात परिवर्तन हवे आहे, फुले शाहू आंबेडकरी विचारांची सत्ता यावी असे आपणास वाटते पण त्यासाठी कंबर कसून काम करावे लागेल साहेबांनी  N x D x S = Change हे सुत्र सांगितले आहे ते विसरुन चालणार नाही. आज समाजाला सत्ता परिवर्तनाची गरज ( N= Need ) वाटत आहे ती मिळविण्याची महत्वाकांक्षा (D= desire ) आहे फक्त समाज कमी पडत आहे तो शक्ती मध्ये ( S= strength ). एवढा मोठा म्हणजे 85 % बहुजन समाज असताना शक्ती का कमी पडत ? याचा विचार आपण केला पाहीजे, हा बहुजन समाज हजारों जातींमध्ये विखुरलेला आहे त्याला जोडण्याचे जे काम कांशिरामसाहेबांनी केले  त्याची निरंतरता कायम असली तरी गती वाढविणे गरजेचे आहे. कारण जो पर्यंत ही शक्ती एका विशिष्ट स्तरावर एक होत नाही तो पर्यंत सत्ता कशी मिळणार ? Power is product of struggle असे साहेब म्हणायचे पण हा संघर्ष ( Struggle ) करण्यासाठी शक्ती हवीच ना ? ही शक्ती एकवटण्यासाठी समाजामध्ये जावे लागेल हे जात असताना साहेबांचाच आणखी एक संदेश लक्षात ठेवावा लागेल तो म्हणजे those who oppose will be required to propose म्हणजे ही सत्ता चांगली नाही असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा चांगलं काय आहे, आपण चांगला पर्याय कसा देणार आहोत हे तळागाळातीच बहुजनांना सांगावे लागेल. महामानवांनी केलेल्या कार्याच्या उजळणी बरोबरच आजच्या परिस्थितीशी त्या विचारांची सुसंगतता व आवश्यकता, शासकीय धोरणं आखताना बहुजनांची केली जाणारी अधिकारीक कत्तल या गोष्टींवर भर द्यावा लागेल. यासाठी या समाजाची गैरराजकीय मुळं घट्ट करण्याचे काम करावे लागेल. ‘जीस समाज की गैरराजनैतीक जडे मजबूत नही होती, उस समाज की राजनिती कामियाब नही होती’ असे जे साहेब म्हणायचे तेही लक्षात  ठेवायला पाहिजे.
साहेबांना खऱ्या अर्थांने आदरांजली अर्पण करायची असेल तर केवळ 15 मार्च  साजरा करुन चालणार नाही तर प्रत्येक क्षणाला  झटावे लागेल. दिल्लीतील सत्तेची चावी जो पर्यंत आपल्या हाती येत नाही तोपर्यंत आपल्याला शांत बसून चालणार नाही. यासाठी तमाम बहुजनांना हत्तीचे बळ होवो अशा सदिच्छा !
जय भीम !                                                                                        
     

Friday, March 8, 2013