![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi3lHD82HzL_NFMeoOObQgtiATktO-beMfCMhOIBZDY2tLZSPqVRtvxhcStwj-_GNQr2gYIPK_VN0S9wvTazebwXvdHAsqfGCtSNNPp4MlhXNc5V8SDXf_iAmW_H_B0NfnUIseZ4xB39WA/s1600/images.jpg)
मला मात्र सचिनला दिलेल्या भारतरत्न बद्दल काहीच अचंबा वाटला नाही कारण या देशात काहीही होऊ शकते … भावनेच्या आधारे चालणारे आंधळे असतात … हे वारंवार सिद्ध झालेय …आणि त्याही भावना उच्चवर्नियाशी किवा निवडणुकांशी जुडलेल्या असतील तर मग काय वाट्टेल ते झाले तरी त्यांचा आदर करावाच लागतो …. ! पण मला राहून राहून एका गोष्टीचे आश्चर्य वाटते ते की अध्याप मोहनदास करमचंद गांधी ( गांधीजी ) यांना भारतरत्न का देले गेले नाही त्याचे ???? कुणी मानो न मानो गांधीजीनी देशासाठी संघर्ष केला , सत्य, अहिंसा यांसाठी आयुष्य वेचले ( त्यांचे सत्याचे प्रयोग हे सत्यानाशाचे प्रयोग आहेत असेही म्हटले जाते ), कॉंग्रेसवालेच नाहीत तर भाजपावालेही गांधीबापुंना खूप खूप मानतात, देश्यात जिकडे तिकडे गांधीवाद्यांची चलती आहे …अण्णा हजारे असतील किवा आसाराम बापू असतील हे सारेच गांधीभक्त … एव्हडे सारे गांधीमय वातावरण या देशात असताना … गांधीना अध्याप भारतरत्न का देण्यात आले नाही … कुणी म्हणेल गांधी हे राष्ट्रपिता आहेत , महात्मा आहेत … पण सरकारी दफ्तरात अशी कोणतीच नोंद नाही … ही पदे घटनात्मक नाहीत …हिंसावादी हिटलरशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना दिलेली राष्ट्रपिताही पदवी आहे … रवींद्रनाथ टागोरांनी दिलेली महात्मा ही पदवी आहे … पण या पदव्या काही घटनात्मक किवा कायदेशीर नाहीत त्यामुळे गांधींना भारतरत्न देलेच पाहिजे अशी मागणी का होत नाही ? का ही पदे घटनात्मक पदांपेक्षा मोठी आहेत असे होऊ शकत नाहीत कारण सरकारनेच तसे उत्तर दिलेले आहे … काल सकाळच्या ज्याने देश्यासाठी काहीच केले नाही त्या सचिनला भारतरत्न देण्यासाठी घाई केली … कायदा बदलला मग गांधीसाठी उशीर का केला जातोय ? का गांधी भारतरत्न नाही? का गांधी सचिनपेक्षा महान नाहीत ? गांधीवादी नेल्सन मंडेला यांना भारतरत्न दिले जाते आणि गांधीना नाही … शतकानंतर गांधी कुणाला माहित होईल की नाही ? माहित झाले तर इंदिरा गांधी , राजीव गांधी होतील कारण ते रेकॉर्डेड भारतरत्न आहेत ! कायदेशीर कागदपत्रेच पुरावा म्हणून मानली जातील ना ? कायदा नसतानाही गांधींचा फोटो नोटेवर आहे मग कायदा असूनही गांधीना भारतरत्न नाही ? का गांधीच्या नावावर आता मते मिळणार नाहीत … भाजपावाले मोदी मोदी करत आहेत आणि कॉंग्रेसवालेही मोदी मोदी करत आहेत, कधी गांधी बोललेच तर सोनिया किवा राहुल गांधी म्हणतात … मोहनदास गांधीजी यांचे चरख्यात गोल गोल फिरून अडकलेले विचार आजच्या यंत्र युगात कालबाह्य झाल्याचे काहींना वाटतात पण कॉंग्रेसलाही तसेच वाटते का ? का गांधी नालायक आहेत ? का बाकीचे भारतरत्न हे गांधी पेक्षा खुजे आहेत ? का गांधी कालबाह्य झाले… याचा विचार झाला पाहिजे … सचिनला विरोध करणार्यांनी गांधींना भारतरत्न देण्यासाठी मोहीम उघडली पाहिजे असे मला मनोमन वाटते… !!!!! नाहीतर उद्या अटलबिहारी वाजपेयीं, अडवाणी , मोदी , अंबानी, सोनिया गांधी, राहुल गांधी , प्रियांका गांधी तिचा नवरा , लेकरं , मुलायमसिंग यादव, राजाभैय्या, लालू यादव, शरद पवार , आसाराम बापू, सत्यसाई बाबा , नरेंद्र महाराज, आठवले , प्रज्ञा सिंग, शीला दीक्षित, आणि कोण कोण भारतरत्न पटकावतील आणि बिचारे गांधी त्यांच्या तीन माकडासारखे हात धरून बसतील …!!!!!
No comments:
Post a Comment