Friday, November 22, 2013

तर्रर्ररुण तेजपालतरुण तेजपाल या तहलकाफेम पत्रकाराने आपल्या महिला सहका-याशी गैरवर्तन केले, 
बलत्कार केला आणि वर तोंड करून मी आता तहलकाच्या संपादकपदावरून सहा  महिने दूर राहण्याची शिक्षा भोगतो असा निवडा दिला … वारे रे वा म्हणजे चोरच न्यायाधीश बनला …. !!!!! 
सर्वच क्षेत्रात महिला असुरक्षित आहेत … अनेक कुत्रे ( खरे तर कुत्र्यांचा 
अपमान होईल  कारण त्यांना संस्कृती नसते !!! ) वेगवेगळी रूप घेवून वावरत आहे … संधी मिळताच ते आपले रूप दाखवतात … महिला न बाहेर सुरक्षित न घरात … !!! न लहान बच्ची सुरक्षित न वयोवृद्ध आजी सुरक्षित … न अडाणी सुरक्षित न शिकलीसवरलेली …असे वाचनात आले आहे की या देश्यात ९५ % महिलांना त्यांच्या आयुष्यात कधी न कधी तरी (कमीत कमी ) विनयभंगाला सामोरे जावे लागते …. अनेक दाबवांमुळे तिला बोलता येत नाही …क्षेत्र कोणतेही -असो महिला कोणतीही असो , कोणत्याही पदावर असो पुरुषाच्या नजरेत कुठे तरी ती एक मादी आहे एव्हडेच असते का ? ती उपभोग्य वस्तू आहे एव्हडेच असते का ?  पत्रकारितेचे क्षेत्र किती आदरणीय मानले जाते । अन्यायाला वाचा फोडणारे मानले जाते…. हुशार बुद्धिमान आणि नैतिक मानले जाते … पण तरुण तेजपाल सारखे अनेक हरामखोर या क्षेत्रात दडलेले आहेत …
पत्रकार हा न्यायाधीश नसतो हे अगदी खरे पण अनेक पत्रकार न्यायाधीशाच्या भूमिकेत दिसतात  तरुण तेजपाल तर त्याही पुढचा निघाला … त्याने विनयभंग केला … 
आणि माफी मागून मी आता सहा महिने संपादक राहणार नाही अशी शिक्षाही घेतली … किती ही  न्यायप्रियता … !!!!! मी दारूच्या नशेत गम्मत करीत होतो माझ्या 
गमतीचा चुकीचा अर्थ लावला गेला असा एस एम एस त्याने त्या मुलीला पाठविला… 
म्हणजे गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली …दारू पिवून तर्र 
होतो हे सांगायलाही लाज वाटत नाही … आणि दारू प्यायली की काही वाट्टेल ते 
करण्याचा परवाना मिळतो का ?? .(दारूच्या नशेत तर्रर्र झालेले अशी गम्मत आपल्या आईशी आणि बहिणीशी का करत नाहीत)  ???? विशेष म्हणजे तहलकाच्या चेअरमन एक महिला असूनही आता तरुण ने माफी मागितली - शिक्षा घेतली प्रकरण संपले असा दावा करत आहेत … !!!!  म्हणजे महिला पुरुषांपासूनच नाही तर महिलांपासुनही सुरक्षित नाहीत … त्या महिला पत्रकाराने आता  पोलीस  केस केली सुरुवातीला त्यांनी हे प्रकरण तहलकाच्या नियमाप्रमाणे संचालकांकडे मांडले … वाहरे वाह नियम … म्हणजे तरुणने खून केला असता तर तक्रार पोलिसात नाही संचालकांकडे … आणि नंतर त्याने माफी मागितली असती स्वतःला एक वर्षाची शिक्षा घेतली असती प्रकरण मिटले असते … खरे तर या मुलीने तरुण आणि तेहालाकाच्या संचालकमंडळविरुद्ध पोलिसात तक्रार केली पाहिजे …अर्थात  गोवा पोलिस कितपत न्याय देतील हा आणखी  वेगळा प्रश्न आहेच … तरीही प्रक्टिकली विचार केला तर एकेकाळी भाजपच्या मागे लागलेल्या या तर्रर्रर्ररुणच्या मुसक्या आवळण्याची संधी गोव्यातील भाजपा सरकारला चालून आलेली आहे …हा संधीचा विषय सोडला तर त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी निर्भयाफेम दिल्ली मिडिया काय दिवे लावतो … विविध संघटना कोणती भूमिका घेतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अन्यायग्रस्त मुलगी किती धिटाई दाखवते यावर सारे अवलंबून आहे … महिलांनी रडण्यापेक्षा लढण्यावर भर दिला तर अनेक हरामखोर वठणीवर येतील … अन्याय करणा-यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो … आणि हा आपली लढाई आपणच लढली पाहिजे कुणी परमात्मा मदतीला येणार नाही हे पक्क लक्षात ठेवायला हवे हेही या निमित्ताने सर्वांनाच सांगावेसे वाटते … !!!!!!

No comments:

Post a Comment