Thursday, November 28, 2013

जुनाट जू फेकून दिले पाहिजे



विद्धेविना मती गेली 
मतीविना निती गेली 
नितीविना गती गेली 
गतीविना वित्त गेले 
वित्ताविना शुद्र खचले 
एव्हडे अनर्थ एका अविद्धे केले 
शिक्षणाचे महत्व एव्हड्या सध्या आणि सोप्या भाषेत सांगणारे, केवळ महत्व सांगूनच न थांबणारे , त्याप्रमाणे शुद्रांसाठी, आणि सर्वच समाजातील स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडे करणारे या देशातील खरे खुरे महात्मा फुले यांचा आज स्मृतिदिन ! खरे तर बहुजन समाजावर महात्मा फुलेंनी केलेले उपकार फार मोठे आहेत… त्यामुळे बहुजनांनी मोठ्या प्रमाणात हा दिवस साजरा करायला हवा होता, किमान या दिवशी तरी चिंतन करायला हवे होते, ज्या पुण्यात या महात्म्याने सावित्रीमाईच्या साथीने शिक्षणाची द्वारे सर्वांसाठी खुली केली त्या पुण्याने मात्र शिक्षणाचे देवत्व काल्पनिक प्रतिमेला दिले, शिक्षणाचे माहेर घर म्हटल्या जणा-या या शहरात महात्मा फुलेनीच ज्ञान ज्योत लावली … पण बहुजन त्यांना विसरून कामधंदा सोडून हात पायाचा टाळ करून, घशाचा मृदुंग करत , गळ्यात अंधश्रद्धेचा फास लटकवून, खांद्यावर परंपरेची विना घेवून, भांवनांचा गजर करीत चमत्काराला नमस्कार करण्यासाठी भलतीकडेच जाताना दिसत आहेत … !!!! असो. 
बहुजन समाज मोठ्या प्रमाणात शाळांमध्ये जाऊ लागला आहे, सरकारी नोक-यांमध्ये दिसत आहे, विविध क्षेत्रांमध्ये डोकावत आहे, एकंदर बहुजन समाजाला तुलनेत चांगले दिवस आले आहेत, महिला सर्वच क्षेत्रांत पुढे येत आहेत ही सारी महात्मा फुले यांनी घेतलेल्या परिश्रमाची फळे आहेत. पण खरेच बहुजन समाज शिक्षित झाला आहे का ? विध्यार्थी झाला आहे का ? विद्ध्यावान ( विद्वान ) झाला आहे का ? काही मोजके बहुजन सोडले तर बहुसंख्य साक्षरच आजूबाजूला दिसतात. केवळ साक्षरता हे महात्मा फुलेंचे उद्धिष्टः नव्हते, तर सा-यांनी ज्ञानी व्हावे हे होते आणि ज्ञानी कशासाठी व्हायचे तर सर्वांगीण विकासासाठी , कुणीही खचून न जाण्यासाठी, सर्वांना एक चांगले जीवन जगता येण्यासाठी, अंधश्रद्धा, मनुवादी परंपरा मोडीत काढण्यासाठी, राष्ट्रीय एकात्मतेसाठी !!!! पण आज केवळ साक्षरांचीच संख्या जास्त दिसत आहे …मतीचा थांग पत्ता नाही  त्यामुळे नीतीचा प्रश्नच नाही। कुणी स्वतःच्या मुलीचे लैंगिक शोषण करीत आहे कुणी म्हातारीचे … एव्हडेच नाही तर आता बकरी आणि कुत्रेही सुटत नाहीयेत…नितीच नाही तर गती कशी राहील… चाललाय देश खाली खाली आणि मग वित्त ? तेही  चाललेय खाली खाली ….रुपयाचे अवमुल्यन होत आहे मग यामुळे बहुजन खचत आहेत। त्यांच्या शोषणात भर पडत आहे … कांदा वाढला…  पेट्रोल वाढले … खत वाढले… बेरोजगारी वाढली आणि हत्या  आत्महत्त्या वाढल्या… शेटजी भटजींची पोटंही  वाढली … आणि खचून गेलेले बहुजन मग पुन्हा मनूच्या तावडीत सापडले …!!!!
१९ व्या शतकात फुलेंनी जे ओळखले होते ते २१ व्या शतकातही लागू होत आहे !!!!
सरकारने तर महात्मा फुलेंना भाजी मंडईवाला बनवून टाकले आहे , फुले माळी समाजात जन्माला आले याचा मळ्यांना कधी कधी अभिमान वाटतो पण त्यांची तत्वे पाळायची म्हटले या माळ्यांचा भोपळा फुटतो । फुलेंनी महारांसाठी काम केले असेही ही मंडळी म्हणायला मागे पुढे पाहत नाही, हा निव्वळ साक्षरतेचा परिणाम आहे. फुलेंनी फक्त महारासाठीच काम केले का ? फुलेंच्या पहिल्या महिला शाळेत ब्राह्मण महिला शिकल्या, ब्राह्मण स्त्रियांना आधार द्यायचे काम या दाम्पत्याने केले एव्हढेच नव्हे तर सा-याच बहुजनांना शाळा शिकविली… !!! 
आजच्या दिनामिनित्त बहुजनांनी या बद्धल चिंतन करायला हवे, वेळीच जागे व्हायला हवे परंपरांचे जुनाट जू  फेकून दिले पाहिजे । नाही तर भविष्यकाळ कठीण आहे… !!!!

Tuesday, November 26, 2013

मनू अभी जिंदा है


२६ नवंबर १९४९ में इस देश की संविधान सभाने नये मानवतावादी संविधानको  स्वीकार किया ।   २६ जनवरी १९५० से इसको लागू किया गया … जिस देश मे हर कानून भगवान के नामसे वेदोन्के आधारसे चलाया जाता था उस देश का यह कानून लोगोन्द्वारा बनाया गया और स्वीकारा गया है । यह एक अपूर्व घटना थी । डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की कडी मेहनत कि वजहसे यह संभव हुआ … बरसोन्से चलते आये मुलतत्ववादी , मनुवादी नीती नियामोन्से छुटकारा मिला … यही सही मायने मे स्वराज्य था , मनूवादियोन्को यह संविधान मंजूर नही है क्युंकी इसमे इंसानियत कि बात हुई है , सबको समान माना है , कई मनूवादी तो इसको अपने गुलामिका आरंभ मानते है । भगवान के नाम पर , धर्म के नाम पर चलनेवाला इनका राज जो चला गया ।
खैर , आज वही दिन है , आप सबको उसकी बहुत बहुत सदिच्छाये । आज के संविधान दिन के उपलक्ष में मै बहुत ही  चिंतीत हु , चिंता उनको लेकर नही जो इसको विरोध  करते है । चिंता उनको लेकर नही जिनका अंध साम्राज्य इस संविधानने नष्ट किया … बल्की चिंता का कारण वह लोक है जो इस संविधान के कारण प्रगती तो  कर रहे है लेकीन अपनेही मस्ती मै अपना इतिहास भूल रहे है । संविधान से प्राप्त अधिकारोन्के वजहसे जी राहे है पर संविधान निर्माता का नाम लेने से शरमा रहे है , संविधान निर्माताने दिखाये हुये पथ पर चलना छोड रहे है , सरकारी नौकारीया कर रहे है, पर इनको देनेवाले को भूल रहे है , नाम बाबा का और काम बापू का कर रहे है , चिंता उनको लेकर है जो अपने बच्चोको संविधान निर्माता महापुरुषसे दूर और सडे हुये काल्पनिक महापूरुषो   की ओर ले जा रहे है , जिस समाज से वह संविधान के आधार पर आगे आ सके उस समाज को भूल रहे है , जीन्होने बरसोसे गुलाम बनाकर रखा था उनके पैर की जुती बनने में लगे हुये है , चिंता उन पढे लिखे लोगोन्के बारेमे है जो अब पहले जैसा कूछ रहा नही , अब जागृती की जरुरत नही ऐसा मानने लगे है …और अपने आपसे झुठ बोल रहे है  ।
बाबासाहबने तो यह कहा था पढे लिखे लोगोने मुझे धोखा दिया … आज भी वही हो रहा है । पर आज पढे लिखे लोग बाबासाहाबको नही अपने आप को और अपने आनेवाले पिढी को  धोखा दे रहे है, मुझे ऐसा क्यू लगता  है , क्युंकी जो लोग इतिहास भुलते है वह इतिहास नही बना सकते यह बाबासाहबने कही हुई बात बहुत ही महत्वपूर्ण है । क्या कह रहा है इतिहास ? आज तक कितने राजा, सम्राट, बादशाह आके गये क्या उनका कार्यकाल दीर्घ काल रहा ? ५०० साल ६०० साल ? उससे ज्यादा ? नही ना क्या कारण थे यह सल्तनते मिठ्ठी होने की , आप गौर से देखेंगे तो पता चलेगा की 'अब सबखूछ ठीक है' यह मानकर रहना . जब आप सब कूछ ठीक है ऐसा मानते हो तब कही न कही आप नजरअंदाजी होती है  । शीत काल में पसीना नही बहाते इसलिये युद्धकाल में बहुत ज्यादा पसीनाउसको  पढता है … बस इसी कारण सल्तनते खत्म हुई । इस देश की बात करे तो मनूवादी, मूलतत्त्ववादी वक्त का इंतजार करता हुआ नजर आता है, वक्त मिलते ही वह हमला कर देता है ।
बस यही चिंता का कारण है , जो बहुजन आज इतिहाससे आनाकानी कर रहा है , सिर्फ अपने और अपने परिवार की सोच रहा ही , वह धोका खाने वाला है , यदी इन लोगोंका यही रवय्या रहा तो संविधानपर चलनेवाला यह देश कूछ सलोबाद फिर से मनुस्मृतीपर चलने लगेगा , और फिरसे बहुजानोंको शुद्र बनकर लानत की जिंदगी गुजार्नी होंगी ।  तब शायद हम सब नही रहेंगे, लेकिन अपने वारीस जरूर रहेंगे ।  वैसे तो मानुवादियोन्के हिसाबसे कलियुग चला है और इसमे ब्राह्मण छोडके बाकी सर्वजन शुद्र है।
आज देश में संविधान लागू होने  को १०० साल भी नही हुए है , फिर भी मानूवादी अपना अस्थित्त्व दिखा रहे है, तो आगे की समस्या बडी है। ऐसा कहते है की सैतान को जल्दी मौत नही आती है , बात एकदम सही है , मनू अभीभी जिंदा है । वह पुरी तरहसे मरा नही है , संविधानने उसे अधमरा किया है , मनूवादी उसको बचानेकी कोशिष में लगे हुए है और बहुजन वह मरा समजकर मस्त है । बस यही बात उसके लिये प्राणवायू का काम कर राही है । उसको मारना होगा पुरी तरह से मारना होंगा , जबतक उसकी अंतिम सांस चाल रही है, तब तक बहुजनोने चैन की सांस नही लेनी है । संविधान का हिथीयार अच्छा है लेकिन उसको सही ढंगसे चलानेवाले हातभी चाहिये ।  

Friday, November 22, 2013

तर्रर्ररुण तेजपाल



तरुण तेजपाल या तहलकाफेम पत्रकाराने आपल्या महिला सहका-याशी गैरवर्तन केले, 
बलत्कार केला आणि वर तोंड करून मी आता तहलकाच्या संपादकपदावरून सहा  महिने दूर राहण्याची शिक्षा भोगतो असा निवडा दिला … वारे रे वा म्हणजे चोरच न्यायाधीश बनला …. !!!!! 
सर्वच क्षेत्रात महिला असुरक्षित आहेत … अनेक कुत्रे ( खरे तर कुत्र्यांचा 
अपमान होईल  कारण त्यांना संस्कृती नसते !!! ) वेगवेगळी रूप घेवून वावरत आहे … संधी मिळताच ते आपले रूप दाखवतात … महिला न बाहेर सुरक्षित न घरात … !!! न लहान बच्ची सुरक्षित न वयोवृद्ध आजी सुरक्षित … न अडाणी सुरक्षित न शिकलीसवरलेली …असे वाचनात आले आहे की या देश्यात ९५ % महिलांना त्यांच्या आयुष्यात कधी न कधी तरी (कमीत कमी ) विनयभंगाला सामोरे जावे लागते …. अनेक दाबवांमुळे तिला बोलता येत नाही …क्षेत्र कोणतेही -असो महिला कोणतीही असो , कोणत्याही पदावर असो पुरुषाच्या नजरेत कुठे तरी ती एक मादी आहे एव्हडेच असते का ? ती उपभोग्य वस्तू आहे एव्हडेच असते का ?  पत्रकारितेचे क्षेत्र किती आदरणीय मानले जाते । अन्यायाला वाचा फोडणारे मानले जाते…. हुशार बुद्धिमान आणि नैतिक मानले जाते … पण तरुण तेजपाल सारखे अनेक हरामखोर या क्षेत्रात दडलेले आहेत …
पत्रकार हा न्यायाधीश नसतो हे अगदी खरे पण अनेक पत्रकार न्यायाधीशाच्या भूमिकेत दिसतात  तरुण तेजपाल तर त्याही पुढचा निघाला … त्याने विनयभंग केला … 
आणि माफी मागून मी आता सहा महिने संपादक राहणार नाही अशी शिक्षाही घेतली … किती ही  न्यायप्रियता … !!!!! मी दारूच्या नशेत गम्मत करीत होतो माझ्या 
गमतीचा चुकीचा अर्थ लावला गेला असा एस एम एस त्याने त्या मुलीला पाठविला… 
म्हणजे गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली …दारू पिवून तर्र 
होतो हे सांगायलाही लाज वाटत नाही … आणि दारू प्यायली की काही वाट्टेल ते 
करण्याचा परवाना मिळतो का ?? .(दारूच्या नशेत तर्रर्र झालेले अशी गम्मत आपल्या आईशी आणि बहिणीशी का करत नाहीत)  ???? विशेष म्हणजे तहलकाच्या चेअरमन एक महिला असूनही आता तरुण ने माफी मागितली - शिक्षा घेतली प्रकरण संपले असा दावा करत आहेत … !!!!  म्हणजे महिला पुरुषांपासूनच नाही तर महिलांपासुनही सुरक्षित नाहीत … त्या महिला पत्रकाराने आता  पोलीस  केस केली सुरुवातीला त्यांनी हे प्रकरण तहलकाच्या नियमाप्रमाणे संचालकांकडे मांडले … वाहरे वाह नियम … म्हणजे तरुणने खून केला असता तर तक्रार पोलिसात नाही संचालकांकडे … आणि नंतर त्याने माफी मागितली असती स्वतःला एक वर्षाची शिक्षा घेतली असती प्रकरण मिटले असते … खरे तर या मुलीने तरुण आणि तेहालाकाच्या संचालकमंडळविरुद्ध पोलिसात तक्रार केली पाहिजे …अर्थात  गोवा पोलिस कितपत न्याय देतील हा आणखी  वेगळा प्रश्न आहेच … तरीही प्रक्टिकली विचार केला तर एकेकाळी भाजपच्या मागे लागलेल्या या तर्रर्रर्ररुणच्या मुसक्या आवळण्याची संधी गोव्यातील भाजपा सरकारला चालून आलेली आहे …हा संधीचा विषय सोडला तर त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी निर्भयाफेम दिल्ली मिडिया काय दिवे लावतो … विविध संघटना कोणती भूमिका घेतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अन्यायग्रस्त मुलगी किती धिटाई दाखवते यावर सारे अवलंबून आहे … महिलांनी रडण्यापेक्षा लढण्यावर भर दिला तर अनेक हरामखोर वठणीवर येतील … अन्याय करणा-यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो … आणि हा आपली लढाई आपणच लढली पाहिजे कुणी परमात्मा मदतीला येणार नाही हे पक्क लक्षात ठेवायला हवे हेही या निमित्ताने सर्वांनाच सांगावेसे वाटते … !!!!!!

Tuesday, November 19, 2013

गांधी भारतरत्न नाहीत ?


ज्याने कर माफीसाठी मी क्रिकेटर नाही कलाकार आहे असे  प्रतिज्ञापत्र दिले, जो केवळ स्वतःसाठी खेळला, ज्या बीसीसीआयने बीसीसीआय ही खासगी व्यावसाईक संस्था आहे तिचा आणि भारत सरकारचा काही संबंध नाही , ती तामिळनाडू सोसायटी रजिस्ट्रेशन कायद्यांतर्गत नोंदणी झालेली संस्था आहे त्यामुळे देश्याशी तिचा थेट संबंध नाही…सरकारला ती उत्तरदायी नाही … खेळाडू हे व्यवसाइक आहेत ते या संस्थेसाठी खेळतात असे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले त्या बीसीसीआयसाठी खेळणाऱ्या  सचिनला भारतरत्न देण्याचा सरकारने निर्णय घेतला त्यावरून देश्यात फारच वादळ उठले आहे … महाराष्ट्र सरकारने तर सचिनचा धडा शाळेत शिकविला जावा यासाठी निर्णय घेतला … सचिनच्या देशाभक्तीपेक्षा पैसा भक्तीवर , भोंदू सत्यसाई बाबावर असलेल्या निष्ठेवर , त्याने केलेल्या नागदोष निवारण पूजेवर थोडक्यात अंधश्रद्धाळूपानावर, त्याच्या रेकॉर्डलोलुपतेवर किती किती चर्चा झाली … सचिन भक्त आणि सचिन विरोधक यांचा सामना लागला … शेवटी भक्त जिंकले सचिनला भारतरत्न जाहीर झाले … विरोधकांना हा जहरी निर्णय अमान्य आहे … असो.
मला मात्र सचिनला दिलेल्या भारतरत्न बद्दल काहीच अचंबा वाटला नाही कारण या देशात काहीही होऊ शकते … भावनेच्या आधारे चालणारे आंधळे असतात … हे वारंवार सिद्ध झालेय …आणि त्याही भावना उच्चवर्नियाशी किवा निवडणुकांशी जुडलेल्या असतील तर मग काय वाट्टेल ते झाले तरी त्यांचा आदर करावाच लागतो …. ! पण मला राहून राहून एका गोष्टीचे आश्चर्य वाटते ते की अध्याप मोहनदास करमचंद गांधी ( गांधीजी ) यांना भारतरत्न का देले गेले नाही त्याचे ???? कुणी मानो न मानो गांधीजीनी देशासाठी संघर्ष केला , सत्य, अहिंसा यांसाठी आयुष्य वेचले ( त्यांचे सत्याचे प्रयोग हे सत्यानाशाचे प्रयोग आहेत असेही म्हटले जाते ), कॉंग्रेसवालेच नाहीत तर भाजपावालेही गांधीबापुंना खूप खूप मानतात, देश्यात जिकडे तिकडे गांधीवाद्यांची चलती आहे …अण्णा हजारे असतील किवा आसाराम बापू असतील हे सारेच गांधीभक्त … एव्हडे सारे गांधीमय वातावरण या देशात असताना … गांधीना अध्याप भारतरत्न का देण्यात आले नाही … कुणी म्हणेल गांधी हे राष्ट्रपिता आहेत , महात्मा आहेत … पण सरकारी दफ्तरात अशी कोणतीच नोंद नाही … ही  पदे घटनात्मक नाहीत …हिंसावादी हिटलरशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना दिलेली  राष्ट्रपिताही पदवी आहे … रवींद्रनाथ टागोरांनी दिलेली महात्मा ही पदवी आहे … पण या पदव्या काही घटनात्मक किवा कायदेशीर  नाहीत त्यामुळे गांधींना भारतरत्न देलेच पाहिजे अशी मागणी का होत नाही ? का ही पदे  घटनात्मक पदांपेक्षा मोठी आहेत असे होऊ शकत नाहीत कारण सरकारनेच तसे उत्तर दिलेले आहे … काल  सकाळच्या ज्याने देश्यासाठी काहीच केले नाही त्या सचिनला भारतरत्न देण्यासाठी घाई केली … कायदा बदलला मग गांधीसाठी उशीर का केला जातोय ? का गांधी भारतरत्न नाही? का गांधी सचिनपेक्षा महान नाहीत ? गांधीवादी नेल्सन मंडेला यांना भारतरत्न  दिले जाते आणि गांधीना नाही … शतकानंतर गांधी कुणाला माहित होईल की नाही ? माहित झाले तर इंदिरा गांधी , राजीव गांधी होतील  कारण ते रेकॉर्डेड भारतरत्न आहेत !  कायदेशीर कागदपत्रेच पुरावा म्हणून मानली जातील ना ? कायदा नसतानाही गांधींचा फोटो नोटेवर आहे मग कायदा असूनही गांधीना भारतरत्न नाही ? का गांधीच्या नावावर आता मते मिळणार नाहीत … भाजपावाले मोदी मोदी करत आहेत आणि कॉंग्रेसवालेही मोदी  मोदी करत आहेत, कधी गांधी बोललेच तर सोनिया किवा राहुल गांधी म्हणतात … मोहनदास गांधीजी यांचे चरख्यात गोल गोल फिरून अडकलेले विचार आजच्या यंत्र युगात कालबाह्य झाल्याचे काहींना वाटतात पण कॉंग्रेसलाही तसेच वाटते का ? का गांधी नालायक आहेत ? का बाकीचे भारतरत्न हे गांधी पेक्षा खुजे आहेत ? का गांधी कालबाह्य झाले…  याचा विचार झाला पाहिजे …  सचिनला विरोध करणार्यांनी गांधींना भारतरत्न देण्यासाठी मोहीम उघडली पाहिजे असे मला मनोमन वाटते… !!!!! नाहीतर उद्या अटलबिहारी वाजपेयीं, अडवाणी , मोदी , अंबानी, सोनिया गांधी, राहुल गांधी , प्रियांका गांधी तिचा नवरा , लेकरं , मुलायमसिंग यादव, राजाभैय्या, लालू यादव, शरद पवार , आसाराम बापू, सत्यसाई बाबा , नरेंद्र महाराज, आठवले , प्रज्ञा सिंग,  शीला दीक्षित, आणि कोण कोण भारतरत्न पटकावतील आणि बिचारे गांधी त्यांच्या तीन माकडासारखे हात धरून बसतील …!!!!!

Saturday, November 16, 2013

फायर प्रूफ जाकेट आणि हातोडा सोबत ठेवावा


Volvo गाड्यांना आग लागून प्रवाशी मारण्याच्या घटना वाढत आहेत त्या मुळे या गाड्यांनी प्रवास करणे धोक्याचे वाटत आहे. विशेष म्हणजे गाडीला आग लागल्याचे माहित झाल्यानंतर बाहेर पडायचे तर काचा फुटत नाहीत आणि सर्व दरवाजे सेन्ट्रल लॉक सिस्टिममुले बंद होऊन जातात …मग केवळ जळून  मारण्या पलीकडे काहीच उरत नाही … हुबळी येथे लागलेल्या आगी वेळी प्रशांत पांडे या २३ वर्षीय  अभियंत्याने हाताने काच पुतळी नाही म्हणून अक्षरशः डोके वापरले … म्हणजे डोके जोर जोरात काचेवर आपटले  काच फुटली … प्रशांत बाहेत पडला आणि त्याबरोबर राहिलेले प्रवाशीही बाहेर पडू शकले … प्रशांत आता डोके फुटल्याने उपचार घेत आहे … ७ प्रवाशी मात्र त्या अगोदरच जळून कोळसा
झाले होते …. प्रशांतच्या बहादुरीचे कौतुकच पण प्रत्येकवेळी डोके काम करेलच असे नाही … म्हणून ज्यांना ज्यांना Volvo ने प्रवास करावा लागेल त्याने फायर प्रूफ जाकेट आणि हातोडा सोबत ठेवावा … प्रवासात झोपू नये … !!!!!! 

-- 

Wednesday, November 13, 2013

हा कसला आदर्श … हा चाचा नाही हा तर चाटू नेहरू !

या देशाचे काय होणार आहे कोण जाने …! या कॉंग्रेसने तर या देशाची अगदी सुरवातीपासून वाट लावलेली आहे. आणि पुढची पिढी बरबाद व्हावी याचे नियोजनही करून ठेवले आहे …पुढच्या पिढीसमोर आदर्श म्हणून ज्यांची नावे सांगितली जातात त्याचा खरेच काही आदर्श आहे का हे पडताळून पाहण्याची गराज निर्माण झालेली आहे … कारण कॉंग्रेसने या देशाच्या माथी मारलेला महात्मा हा किती महाधोकात्मा होता हे तर उघडच झालेले आहे … तो
तर गे होता त्याची पार्टनरला लिहिलेली प्रेमपत्रेच सापडलीत  , एक स्वातंत्र्य सेनानी जेल मध्ये असताना हा त्याच्या घरी एक महिना राहिला त्याच्या सरला नावाच्या बायकोचे सौंदर्य बघून तो घसरला , तिच्या प्रेमात पडला … चांगली सेवा करून घेतली आणि परत तिला पत्र लिहून आपला सहवास हा आत्मिक विवाह होता असे म्हणाला … चार पोरांचा बाप असलेल्या या मोहनाने  एव्हढी गंधी हरकत केली तरी तो महात्मा ? 
आज ज्याचा वाढदिवस आहे आणि कॉंग्रेसवाल्यांनी ज्याला भारतीयांच्या माथी चाचा म्हणून मारला, आणि ज्याचा वाढ दिवस बालक दिन म्हणून साजरा करण्याची सुरुवात केली तो  पंडित जवाहरलाल नेहरू ! कसला आदर्श घ्यायचा बालकांनी त्याचा ? लाचारीने एडविना माउंटब्याटन हिच्या मागे पुढे  करणारा ? तिला सिगारेट पेटवून देणारा ? दारू पिणारा ?  एडविनाला दारूचा ग्लास भरून देणारा ?केवळ  एडविनाच नव्हे आणखी तीन महिलांशी त्याचे अफ़ेअर होते , म्हणजेच परस्त्री समोर लाळ घोटणारा नेहरू हा कसला आदर्श असू शकतो ? बालकांनी उद्या मोठे होऊन या चाचा सारखी चाटुगिरी करावी त्यासाठी आदर्श का ? सिगारेट ओढावी आणि इतरांनाही सिगारेट ओढण्यासाठी मदत करावी याचा आदर्श घ्यायचा का ? दुस-याच्या बायको समोर लाळघोटेपणा करण्याचा आदर्श का ? की कोणतीही नितीमत्ता न ठेवता लफडी करण्याचा आदर्श ? 
नेहरू हा फारच रंगेल माणूस होता हे वारंवार वाचनात येत आहे, त्याचा रंगेलपणाची छायाचित्रे उपलब्ध आहेत …त्याचा छातीला गुलाब असायचे पण मनात गजरा असायचा ….छातीला असणारे गुलाबच त्याच्या रंगेलपानाची साक्ष देते ….    त्यावरून तो चाचा किंवा चाचू नेहरू नाही तर चाटू नेहरू होता हे उघड होतेय … मग अशा चाटूचा वाढदिवस बालकदिन म्हणून साजरा करणे कितपत योग्य ????
माणूस जेव्हाडा मोठा होतो तेव्हढ्या जबाबदारीने त्याने वागले पाहिजे … तेव्हडी त्याकडून नैतिकतेची अपेक्षा असते नैतिकता हा सर्वात महत्वाचा गुण अंगी असणे आवश्यक आहे पण त्याचीच कमी कॉंग्रेसने निर्माण केलेल्या आदर्श्यांकडे आहे … !!!!!! ( येथे या माणसांचा एकेरीत उल्लेख केलाय त्यामुळे काहींना वाईट वाटेल , राग येईल मला काही आदर बिदर नाही का असा प्रश्न पडेल पण मी माणसांचा आदर त्यांच्या चारित्र्य, नितीमत्ता, बुद्धीमत्ता या अश्या सद्दगुणांनुसार करतो , नुसता वयाचा नि नाव मोठे असल्यानेच आदर करायचा झाला तर लादेन, दाउद यांचाही आदर करावा लागेल … !!!!)