Thursday, April 30, 2009

रामाला माहि़ती

चंद्रपुरातील रामाळा तलाव हा फारच प्रसिद्ध आहे । तलाव म्हटले की पाणी , त्यात मासे, कमळ असतात पण हे रामाळा तलाव विशेष आहे । यात पाणी मासे यांचबरोबर काडतूसेही मिळतात । खरच , तीही जिवंत । एक दोन नाहीत तर तब्बल ५००० ( पाच हजार ) । गेली काही वर्षे या तलावातून काडतूस सापडत आहेत । विदर्भात नक्षलवादी कारवाया होतात , तलावात सापडलेल्या काडतूसांमागेही या करवाया असल्याचे वाटत असले तरी एक बाब विचार करण्यासारखी आहे ती म्हणजे नक्षलवादी ही काडतुसे वारंवार तलावात का टाकतील ? काडतूस काय फडतूस आहेत की कुठेही टाका आता तर जी काडतूस सापडली ती तर परराज्यातिल पोलिसांची आहेत असे चंद्रपुर पोलिसांचे म्हणने आहे । मग प्रश्न असा आहे की , रामाळा तलावात ही काडतुसे आली कशी ? नक्षलवादयानी ती जर आणली असतील तर ती त्यांनी उघड्यावर का टाकली ? या मागे दुसराच संशय येतो तो असा की पोलिसच काडतुसे प्लांट करीत नसतील ना ? कारण गडचिरोली , गोंदिया या दोन जिल्ह्यातच नक्षलवादी कारवाया होत असतात , त्यामुळे येथे कर्मचारी वर्गाला नक्षलभत्ता मिळतो, तसाच तो आपल्यालाही कायम मिळावा असे जर वाटत असेल तर आमच्याकडेही नक्षलवादी आहेत हे दाखवणे गरजेचे आहे । रामालाच माहिती खर खोटे ।

No comments:

Post a Comment