Thursday, April 30, 2009

जय महाराष्ट्र

आज महाराष्ट्र दिन , १ में १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा पासून मुंबई कोणाची हा विषय या न त्या कारणाने चर्चेला येतच राहिला । मराठी माणसाची मुंबई हे सर्वांनीच मान्य केले पण प्रत्यक्षात मुम्बैवर राज्य दिसले ते वेगळेच। शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाची बाजू उचलून धरली । उठाव लुंगी बजाओ पुंगी ही घोषणा केली वातावरण ढवळृन गेले । युतीची सत्ता आली पण मुंबई जैसे थे । आता राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे तमाम मराठी माणसाने राज यांना उचलून धरले । मनसे ला दिलसे दाद मिळत आहे । असो ।
पण खरच मराठी माणूस मुंबई मध्ये निर्णायक आहे का हा विचार करण्याचा विषय आहे । कारण नुकत्याच झालेल्या निवडणुकीदरम्यान जी आकडेवारी समोर आली त्या नुसार मुंबई मधील मुंबई उत्तर , मुंबई उत्तर पच्छिम , मुंबई उत्तर पूर्व , मुंबई उत्तर मध्य , मुंबई दक्षिण मध्य , मुंबई दक्षिण या मतदार संघात सरासरी केवळ ३५ % मतदार हे मराठी मतदार आहेत । याचाच अर्थ असा की ६५ % मतदार हे गैर मराठी आहेत ।

No comments:

Post a Comment