Friday, May 20, 2011

देशाला हवा आहे योग्य गुरु ...............

आपल्या देशात सध्या भ्रष्टाचारविरोधी जो तो आंदोलन करीत आहे ..... ही चांगली गोष्ठ आहे पण जी लोक आंदोलने करीत आहेत ती किंवा त्यांना पाठींबा देणारी मंडळी कशी आहे हे जनतेला माहीतच आहे ........खरे तर आपल्या देशात आर्थिक भ्रष्टाचारापेक्षा धार्मिक आणि कार्मिक भ्रष्टाचारच मोठा जीवघेणा आहे .......साधं उदाहरणच घ्यायचे झाले तर सत्यसाईबाबा यांना तीरांग्यामध्ये गुंडाळून अखेरची सलामी देण्यात आली याचाच अर्थ बाबा देशासाठी शहीद झालेल्या वीरांच्या तोडीचे ठरले .....हाही भ्रष्टाचारच आहे पण त्याविरुद्ध एकही गुरु बोलत नाही . . . .नीरा राडिया या तर मोठमोठ्या कंपन्यांसाठी आणि मंत्र्यांसाठी संयोग गुरु ठरल्या पण या कंपन्यांविरुद्ध कोणी बाबा, अण्णा बोलत नाही ..........वेदिशी बंकेंत असलेला पैसा समोर केला जात आहे आणि या देशात ठिकठिकाणी बाबा बुवांच्या माध्यमातून , जमिनीमधून गुंतवलेला पैसा झाकून तर ठेवला जात नाही ना ? असे म्हणतात भारत हा गरीब लोकांचा आणि श्रीमंत देवांचा देश आहे . देवस्थानांचे बजेट पाहता ते पटते . . . लोकांनी मनोभावे अर्पण केलेल्या पेक्षा लोकांना मनसोक्त लुटून गोळा केलेला पैसा तर या ठिकाणी दडवून ठेवला जात नाही ना हे कोणी पाहावं ? ......याबाबत हे गुरु का बोलत नाहीत .........सिंधू नदी भारतात पुन्हा आणायची स्वप्नं पाहणे वाईट नाही पण आपल्या नद्या पहिल्या टिकवणे शहाणपणाचे नाही का ? ..........

Saturday, May 7, 2011

गरज सरो वैद्य मरो

गरज सरो वैद्य मरो
जलस्वराज्य प्रकल्पातील तज्ञांच्या बाबतीत सरकारने घेतलेली भूमिका अशीच आहे . आता हा तज्ञ दारोदारी फिरेल आणि आपली कहाणी सांगेल तरी सर्वांना विनंती आहे की किमान त्याचे ऐकून घ्या हो . कारण तुम्ही अनेक युवकांना वाचवू शकता . त्यांना हा सल्ला देवू शकता की सरकारची कंत्राटी नोकरी नको रे बाबा ...........

Thursday, April 21, 2011

कोंकणी माणसाची नस

कोंकणी माणसाची नस
दाखवत होता फणस
काटे दिसती अंग भर
परी आत गरेभर रस
राजकारण येता मध्ये हे
उगा झडतो बुद्धीचा कस
बदलत चालली ओळख ही
बदनाम होतोय फणस
                       --- हट्टी कवी  
 
 
 

Tuesday, April 5, 2011

मी भ्रष्टाचार करीत नाही ........ !

मी भ्रष्टाचार कधी करीत नाही
कारण मला संधी मिळत  नाही
एकदा संधी देऊनच  पहा
या क्षेत्रातही मला अजमावून पहा
तुम्हाला मी कधी विसरणार नाही
कारण सोन्याचे अंडी देणारी कोंबडी
शहाणा कधी कापत नाही
पैसा केला फार तर ओरडू नका उगा
जगाची रीतच आहे ही
कपड्याखाली जो तो नंगा
                        _____ हट्टी कवी

Sunday, January 16, 2011

तेरे नाम से शुरू तेरे नाम से खतम

तेरे नाम से शुरू तेरे नाम से खतम  . . . . . कृपया क्लिक करा

Thursday, January 6, 2011

अभिवादन सावित्रीबाई

चार भिंतित महिलांचा श्वास कोंढून होता तो मोकळा करण्यासाठी सावित्रीबाई लढल्या। त्यांचा जन्म दिवस हा बालिकादिन म्हणून साजरा केला जातो पण केवळ एकच दिवस बालिकेला महत्व देवून चालणार नाही। आजच्या बलिकांसठी सवित्रिबाईंची कमतरता भासयला नको आज महिला शिकत आहेत पुरुषांच्या बरोबरीने वावरत आहेत पण जरा बारकाईने विचार करायला हवा की त्या खरोखरच स्वतंत्र आहेत का ? पोथिपुराणाच्या भ्रामक कल्पनांतून बाहेर पडल्या आहेत का ? आजही मानसिक गुलामगिरीत सारा समाज खितपत पडलेला आहे । जग मंगळावर पोहोचले आहे तरीही मंगळ आहे म्हणून मुलींना हिनवले जाते . ये २१ व्या शतकात आजही सावित्रीबाई यांनी १९ व्या शतकात घालून दिलेला आदर्श मानायला , अंगिकरायला समाज धजत नाही । आज संपूर्ण भारतात एक हजार पुरुषांमागे ९३३ महिला आहेत तर महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण हे केवळ ५४ % आहे आजही समाजा मध्ये मुला मुलिंमध्ये भेदभाव केला जातो । सवित्रिबाईंनी केलेल्या कार्यात कोणताही जातीभेद नव्हता । प्रत्येक जाती धर्मातील स्त्रियांसाठी त्या लढल्या त्यात दलित महिला होत्या तश्याच ब्राहमण मुसलमान महिलाही होत्या पण आज सावित्रीबाई केवळ एकाच समाजाच्या बनुन रहिल्यात असे चित्र दिसते। आज किती पुढारलेल्या महिला त्यांचे नाव घेतात ? सावित्रीबाई या मराठीतल्या पहिल्या कवियत्री आहेत पण नाथूराम गोडसेची साहित्यिक औलाद साहित्य सम्मेलनात त्यांचा उल्लेख करत नाही। नाथूरामचे गोडवे गाणारे विशेषांक या वेळी साहित्य संमेलनात वितरित करण्यात आले . बहुजनांसाठी त्यावेळी समाजसुधारकांनी प्रयत्न केले पण आज बहुजणांनी त्यांची कास सोडलेली आहे का ? बहुजणांनी शिक्षणाची कास सोडून चालणार नाही आज अनेक महिला शिकत आहेत त्यांनी आपल्या अन्य भागिनिना विसरून चालणार नाही। बहुजनान्ना प्रगतीच्या नव्या नव्या दिशा दिसत आहेत त्यांनी इतरांना दिशाहीन सोडून चालणार नाही। परीस्थितीमुळे रडत बसण्यापेक्षा लढण्यास सज्ज व्हा त्यासाठी सावित्रीबाई यांच्या कवितेच्या पंक्ति लक्षात घेणे गरजेचे आहे
न कुरकुरता न आळसता शाळेत जाऊ शिकू चला
गुलामगिरीची युगायुगाची बड़ी तोडू चला

मानसिक गुलामगिरी तोड़ने हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल ।