Monday, January 11, 2010

ज्ञानअमृतवेल:अमृतवेल


आपणास बचत करायची आहे का ? देश्याची अर्थव्यवस्था समजुन घ्यायचीय का ? मग तुम्ही अमृतवेल हा दिवाली अंक वाचावा संग्रही ठेवावा काय आहे यात ? हा अंक फारच उल्लेखनीय असा आहे. कारण त्यात बैंक राष्ट्रीयकरण या विषयाचा उहापोह केलेला आहे . दीपावली हा आनंदाचा सण मानला जातो . दिवाळी अंक म्हटला त्यात गमती जमती असतात असाच अपला समज असतो, पण या अमृतवेलने ज्ञानामृत पाजले आहे. या अंकाने विचारांचे फटाके, अर्थकरणाचा फराळ, देशाच्या आर्थिक भावितव्याबाबतचे सुदर्शनचिंतन यांचा आधार घेत साजरी केली आहे . बैंक राष्ट्रीयकरण काय? ते कशासाठी झाले? त्यामागे कारणे कोणती ? त्याचे परिणाम काय ? काय कमावले ? काय गमावले ? असे खमंग कांदेपोहे ( खरतर उहापोह ) या अंकातून आपल्या समोर येतात अंक वाचनीय आहे हे ज्ञानअमृत सर्वांनीच प्राशन करावे असे वाटते .
या अंकातून स्विस बैंक , कडकीच्या काळात करावयाची छोटी पण मोठी बचत या बाबत फारच अनमोल अशी माहिती आहे कार्यकारी संपादक धर्मेन्द्र पवार यांनी या अंकाची केलेली माडणी सुरेख वाटते अतिथि संपादक दशरथ पारेकर, संपादक विद्यानंद पंडित यांनी या अंकाला आणि विषयाला न्याय दिलेला आहे . अमृतवेल या वि स खांडेकर यांच्या साहित्यकृतिच्या नावाने हा अंक सुरु करण्यामागची कल्पकता दिसून येते . जीत ही जीतच आहेत .

No comments:

Post a Comment