Saturday, August 31, 2013
Tuesday, August 20, 2013
हजारो दाभोलकर मेले तरी चालतील पण आम्ही सुधारणार नाही
खरे तर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्तेचे खरे कारण उघड होणे आहे । मारणारे हात सापडले तर लक्षात येईल की टोपी खाली काळे डोके कुणाचे आहे … पण एक मात्र खरे की …. नरेंद्र दाभोलकरांची हत्या ही परंपराच आहे… जो आमच्या सडलेल्या चालीरीती विरुद्ध बोलेले, जुनाट धार्मिक कर्मकांड बंद करण्याची भाषा करेल] आमच्या सडलेल्या रूढी परंपरांच्या विरुद्ध आवाज काढेल, आमच्या कर्मठपणाबद्दल बोलेल त्याला असेच मरावे लागेल …जोतीबा, बाबासाहेब यांच्यावर हल्ले झाले … तुकारामाला सदेह वैकुंठात पाठविले गेले … अनेक उदाहरणे आहेत … दाभोलकरांनी तशीच काहीशी चूक केली ( त्यांची आणि जोतीबा , बाबासाहेब, तुकारामांची बरोबरी नाही होऊ शकत , केवळ परंपरा सांगण्यासाठी … ) त्यांनी चालवलेला लढा हा यांची दुकानदारी बंद करणार होता … मग आमच्या ढेर पोटांचे कसे …. बहुजनांना लुटण्याच्या धंद्याचे कसे ???
माणूस मारून विचार मारता येत नाहीत हे जरी खरे असले तरी विचारांची गती थांबते … कारण आजचा समाज हा शिक्षणामुळे भेकड झालेल्या डोक्यांचा आहे … मरु देत … कुणीही … आपल्याला त्या भानगडीत पडायचे नाही … मी माझी बायको … बाल्या आणि बाली … आणि दहा बाय दहाची खोली … बस !!! असा भेकड समाज मारण्याच्याच लायकीचा आहे … पण त्याला वाचाविण्यासाठी निघालेल्यांचे दाभोलकर होतात …। त्यामुळेच माणूस मारला की विचाराची गती थांबते हे सत्य स्वीकारावेच लागेल … शिकून भेकड बनलेल्यानी आणि बुद्धी कुणा तरी बाबा, बुवा, पुजा-याच्या पायावर गहान ठेवालेल्यांनी कृपया दाभोलकरांना श्रद्धांजली वाहू नये बस एव्हडी मरणोत्तर कृपा त्यांच्यावर करावी …
महाराष्टाच नव्हे तर सा-या देश भर हा दहशदवाद आहे … आम्ही पाकिस्तान आदि देशांना दहशदवादी म्हणतो पण आपल्यातच दहशदवादी दिसतात … त्यांचे काय ? महाराष्ट्रात संतांचे, शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेतल्याशिवाय राज्य करता येत नाही म्हणून त्यांचे नाव घेतले जाते नाहीतर त्यांचे विचार वेशिलाच टांगलेले दिसतात … त्यामुळेच दाभोल्कारांसारखे रस्त्यात मरतात … सरकारने या तांत्रिक मांत्रिक धार्मिक दहशद्वाल्यांना पोसलेले आहे … त्यामुळे असे हजारो दाभोलकर मेले तरी चालतील पण आम्ही सुधारणार नाही आणि बहुजनांना सुधारुही देणार नाही अशीच सरकारची कृती दिसते …. आता सरकार जादू टोणा विरोधी कायदा करेल त्याला दाभोलकरांचे नाव देईल आणि मग त्यांच्या टाळूवरचे लोणी खाईल ….
Thursday, August 15, 2013
Subscribe to:
Posts (Atom)