चार भिंतित महिलांचा श्वास कोंढून होता तो मोकळा करण्यासाठी सावित्रीबाई लढल्या। त्यांचा जन्म दिवस हा बालिकादिन म्हणून साजरा केला जातो पण केवळ एकच दिवस बालिकेला महत्व देवून चालणार नाही। आजच्या बलिकांसठी सवित्रिबाईंची कमतरता भासयला नको आज महिला शिकत आहेत पुरुषांच्या बरोबरीने वावरत आहेत पण जरा बारकाईने विचार करायला हवा की त्या खरोखरच स्वतंत्र आहेत का ? पोथिपुराणाच्या भ्रामक कल्पनांतून बाहेर पडल्या आहेत का ? आजही मानसिक गुलामगिरीत सारा समाज खितपत पडलेला आहे । जग मंगळावर पोहोचले आहे तरीही मंगळ आहे म्हणून मुलींना हिनवले जाते . ये २१ व्या शतकात आजही सावित्रीबाई यांनी १९ व्या शतकात घालून दिलेला आदर्श मानायला , अंगिकरायला समाज धजत नाही । आज संपूर्ण भारतात एक हजार पुरुषांमागे ९३३ महिला आहेत तर महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण हे केवळ ५४ % आहे आजही समाजा मध्ये मुला मुलिंमध्ये भेदभाव केला जातो । सवित्रिबाईंनी केलेल्या कार्यात कोणताही जातीभेद नव्हता । प्रत्येक जाती धर्मातील स्त्रियांसाठी त्या लढल्या त्यात दलित महिला होत्या तश्याच ब्राहमण मुसलमान महिलाही होत्या पण आज सावित्रीबाई केवळ एकाच समाजाच्या बनुन रहिल्यात असे चित्र दिसते। आज किती पुढारलेल्या महिला त्यांचे नाव घेतात ? सावित्रीबाई या मराठीतल्या पहिल्या कवियत्री आहेत पण नाथूराम गोडसेची साहित्यिक औलाद साहित्य सम्मेलनात त्यांचा उल्लेख करत नाही। नाथूरामचे गोडवे गाणारे विशेषांक या वेळी साहित्य संमेलनात वितरित करण्यात आले . बहुजनांसाठी त्यावेळी समाजसुधारकांनी प्रयत्न केले पण आज बहुजणांनी त्यांची कास सोडलेली आहे का ? बहुजणांनी शिक्षणाची कास सोडून चालणार नाही आज अनेक महिला शिकत आहेत त्यांनी आपल्या अन्य भागिनिना विसरून चालणार नाही। बहुजनान्ना प्रगतीच्या नव्या नव्या दिशा दिसत आहेत त्यांनी इतरांना दिशाहीन सोडून चालणार नाही। परीस्थितीमुळे रडत बसण्यापेक्षा लढण्यास सज्ज व्हा त्यासाठी सावित्रीबाई यांच्या कवितेच्या पंक्ति लक्षात घेणे गरजेचे आहे
न कुरकुरता न आळसता शाळेत जाऊ शिकू चला
गुलामगिरीची युगायुगाची बड़ी तोडू चला
मानसिक गुलामगिरी तोड़ने हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल ।
Subscribe to:
Post Comments (Atom)
jst gr8
ReplyDelete: Uday