Tuesday, January 12, 2010

आम्ही मुक्त ?


आपण स्वतंत्र झालो म्हणजे काय झाले ? तर आपल्याला आपल्या मनासारखे निर्णय घेता येतात . आता सोबतचा फोटोच पहाना काय सांगतोय ते ! याएक पोपट पिंजरामुक्त आहे , पण तरीही त्याला पिंजराच एव्हढा प्रिय आहे की तो त्या पिंज~यावरच बसलेला असतो , अगदी आपल्या सारखाच नाही का ? आपण मुक्त झालो पण आजही आपण त्याच पिंज~यावर आहोत असे नाही वाटत आपल्याला ? 'आकाशी झेप घे रे पाखरा , सोडी सोन्याचा पिंजरा ' हे गीत ऐकायला आपल्याला आवडते पण पिंजरा सोडवत नाही . . . आपण राजकीय, सामाजिक, धार्मिक जोखडात आजही पूर्वी सारखेच अढकलो आहोत . . .

1 comment: