Tuesday, November 19, 2013

गांधी भारतरत्न नाहीत ?


ज्याने कर माफीसाठी मी क्रिकेटर नाही कलाकार आहे असे  प्रतिज्ञापत्र दिले, जो केवळ स्वतःसाठी खेळला, ज्या बीसीसीआयने बीसीसीआय ही खासगी व्यावसाईक संस्था आहे तिचा आणि भारत सरकारचा काही संबंध नाही , ती तामिळनाडू सोसायटी रजिस्ट्रेशन कायद्यांतर्गत नोंदणी झालेली संस्था आहे त्यामुळे देश्याशी तिचा थेट संबंध नाही…सरकारला ती उत्तरदायी नाही … खेळाडू हे व्यवसाइक आहेत ते या संस्थेसाठी खेळतात असे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले त्या बीसीसीआयसाठी खेळणाऱ्या  सचिनला भारतरत्न देण्याचा सरकारने निर्णय घेतला त्यावरून देश्यात फारच वादळ उठले आहे … महाराष्ट्र सरकारने तर सचिनचा धडा शाळेत शिकविला जावा यासाठी निर्णय घेतला … सचिनच्या देशाभक्तीपेक्षा पैसा भक्तीवर , भोंदू सत्यसाई बाबावर असलेल्या निष्ठेवर , त्याने केलेल्या नागदोष निवारण पूजेवर थोडक्यात अंधश्रद्धाळूपानावर, त्याच्या रेकॉर्डलोलुपतेवर किती किती चर्चा झाली … सचिन भक्त आणि सचिन विरोधक यांचा सामना लागला … शेवटी भक्त जिंकले सचिनला भारतरत्न जाहीर झाले … विरोधकांना हा जहरी निर्णय अमान्य आहे … असो.
मला मात्र सचिनला दिलेल्या भारतरत्न बद्दल काहीच अचंबा वाटला नाही कारण या देशात काहीही होऊ शकते … भावनेच्या आधारे चालणारे आंधळे असतात … हे वारंवार सिद्ध झालेय …आणि त्याही भावना उच्चवर्नियाशी किवा निवडणुकांशी जुडलेल्या असतील तर मग काय वाट्टेल ते झाले तरी त्यांचा आदर करावाच लागतो …. ! पण मला राहून राहून एका गोष्टीचे आश्चर्य वाटते ते की अध्याप मोहनदास करमचंद गांधी ( गांधीजी ) यांना भारतरत्न का देले गेले नाही त्याचे ???? कुणी मानो न मानो गांधीजीनी देशासाठी संघर्ष केला , सत्य, अहिंसा यांसाठी आयुष्य वेचले ( त्यांचे सत्याचे प्रयोग हे सत्यानाशाचे प्रयोग आहेत असेही म्हटले जाते ), कॉंग्रेसवालेच नाहीत तर भाजपावालेही गांधीबापुंना खूप खूप मानतात, देश्यात जिकडे तिकडे गांधीवाद्यांची चलती आहे …अण्णा हजारे असतील किवा आसाराम बापू असतील हे सारेच गांधीभक्त … एव्हडे सारे गांधीमय वातावरण या देशात असताना … गांधीना अध्याप भारतरत्न का देण्यात आले नाही … कुणी म्हणेल गांधी हे राष्ट्रपिता आहेत , महात्मा आहेत … पण सरकारी दफ्तरात अशी कोणतीच नोंद नाही … ही  पदे घटनात्मक नाहीत …हिंसावादी हिटलरशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना दिलेली  राष्ट्रपिताही पदवी आहे … रवींद्रनाथ टागोरांनी दिलेली महात्मा ही पदवी आहे … पण या पदव्या काही घटनात्मक किवा कायदेशीर  नाहीत त्यामुळे गांधींना भारतरत्न देलेच पाहिजे अशी मागणी का होत नाही ? का ही पदे  घटनात्मक पदांपेक्षा मोठी आहेत असे होऊ शकत नाहीत कारण सरकारनेच तसे उत्तर दिलेले आहे … काल  सकाळच्या ज्याने देश्यासाठी काहीच केले नाही त्या सचिनला भारतरत्न देण्यासाठी घाई केली … कायदा बदलला मग गांधीसाठी उशीर का केला जातोय ? का गांधी भारतरत्न नाही? का गांधी सचिनपेक्षा महान नाहीत ? गांधीवादी नेल्सन मंडेला यांना भारतरत्न  दिले जाते आणि गांधीना नाही … शतकानंतर गांधी कुणाला माहित होईल की नाही ? माहित झाले तर इंदिरा गांधी , राजीव गांधी होतील  कारण ते रेकॉर्डेड भारतरत्न आहेत !  कायदेशीर कागदपत्रेच पुरावा म्हणून मानली जातील ना ? कायदा नसतानाही गांधींचा फोटो नोटेवर आहे मग कायदा असूनही गांधीना भारतरत्न नाही ? का गांधीच्या नावावर आता मते मिळणार नाहीत … भाजपावाले मोदी मोदी करत आहेत आणि कॉंग्रेसवालेही मोदी  मोदी करत आहेत, कधी गांधी बोललेच तर सोनिया किवा राहुल गांधी म्हणतात … मोहनदास गांधीजी यांचे चरख्यात गोल गोल फिरून अडकलेले विचार आजच्या यंत्र युगात कालबाह्य झाल्याचे काहींना वाटतात पण कॉंग्रेसलाही तसेच वाटते का ? का गांधी नालायक आहेत ? का बाकीचे भारतरत्न हे गांधी पेक्षा खुजे आहेत ? का गांधी कालबाह्य झाले…  याचा विचार झाला पाहिजे …  सचिनला विरोध करणार्यांनी गांधींना भारतरत्न देण्यासाठी मोहीम उघडली पाहिजे असे मला मनोमन वाटते… !!!!! नाहीतर उद्या अटलबिहारी वाजपेयीं, अडवाणी , मोदी , अंबानी, सोनिया गांधी, राहुल गांधी , प्रियांका गांधी तिचा नवरा , लेकरं , मुलायमसिंग यादव, राजाभैय्या, लालू यादव, शरद पवार , आसाराम बापू, सत्यसाई बाबा , नरेंद्र महाराज, आठवले , प्रज्ञा सिंग,  शीला दीक्षित, आणि कोण कोण भारतरत्न पटकावतील आणि बिचारे गांधी त्यांच्या तीन माकडासारखे हात धरून बसतील …!!!!!

Saturday, November 16, 2013

फायर प्रूफ जाकेट आणि हातोडा सोबत ठेवावा


Volvo गाड्यांना आग लागून प्रवाशी मारण्याच्या घटना वाढत आहेत त्या मुळे या गाड्यांनी प्रवास करणे धोक्याचे वाटत आहे. विशेष म्हणजे गाडीला आग लागल्याचे माहित झाल्यानंतर बाहेर पडायचे तर काचा फुटत नाहीत आणि सर्व दरवाजे सेन्ट्रल लॉक सिस्टिममुले बंद होऊन जातात …मग केवळ जळून  मारण्या पलीकडे काहीच उरत नाही … हुबळी येथे लागलेल्या आगी वेळी प्रशांत पांडे या २३ वर्षीय  अभियंत्याने हाताने काच पुतळी नाही म्हणून अक्षरशः डोके वापरले … म्हणजे डोके जोर जोरात काचेवर आपटले  काच फुटली … प्रशांत बाहेत पडला आणि त्याबरोबर राहिलेले प्रवाशीही बाहेर पडू शकले … प्रशांत आता डोके फुटल्याने उपचार घेत आहे … ७ प्रवाशी मात्र त्या अगोदरच जळून कोळसा
झाले होते …. प्रशांतच्या बहादुरीचे कौतुकच पण प्रत्येकवेळी डोके काम करेलच असे नाही … म्हणून ज्यांना ज्यांना Volvo ने प्रवास करावा लागेल त्याने फायर प्रूफ जाकेट आणि हातोडा सोबत ठेवावा … प्रवासात झोपू नये … !!!!!! 

-- 

Wednesday, November 13, 2013

हा कसला आदर्श … हा चाचा नाही हा तर चाटू नेहरू !

या देशाचे काय होणार आहे कोण जाने …! या कॉंग्रेसने तर या देशाची अगदी सुरवातीपासून वाट लावलेली आहे. आणि पुढची पिढी बरबाद व्हावी याचे नियोजनही करून ठेवले आहे …पुढच्या पिढीसमोर आदर्श म्हणून ज्यांची नावे सांगितली जातात त्याचा खरेच काही आदर्श आहे का हे पडताळून पाहण्याची गराज निर्माण झालेली आहे … कारण कॉंग्रेसने या देशाच्या माथी मारलेला महात्मा हा किती महाधोकात्मा होता हे तर उघडच झालेले आहे … तो
तर गे होता त्याची पार्टनरला लिहिलेली प्रेमपत्रेच सापडलीत  , एक स्वातंत्र्य सेनानी जेल मध्ये असताना हा त्याच्या घरी एक महिना राहिला त्याच्या सरला नावाच्या बायकोचे सौंदर्य बघून तो घसरला , तिच्या प्रेमात पडला … चांगली सेवा करून घेतली आणि परत तिला पत्र लिहून आपला सहवास हा आत्मिक विवाह होता असे म्हणाला … चार पोरांचा बाप असलेल्या या मोहनाने  एव्हढी गंधी हरकत केली तरी तो महात्मा ? 
आज ज्याचा वाढदिवस आहे आणि कॉंग्रेसवाल्यांनी ज्याला भारतीयांच्या माथी चाचा म्हणून मारला, आणि ज्याचा वाढ दिवस बालक दिन म्हणून साजरा करण्याची सुरुवात केली तो  पंडित जवाहरलाल नेहरू ! कसला आदर्श घ्यायचा बालकांनी त्याचा ? लाचारीने एडविना माउंटब्याटन हिच्या मागे पुढे  करणारा ? तिला सिगारेट पेटवून देणारा ? दारू पिणारा ?  एडविनाला दारूचा ग्लास भरून देणारा ?केवळ  एडविनाच नव्हे आणखी तीन महिलांशी त्याचे अफ़ेअर होते , म्हणजेच परस्त्री समोर लाळ घोटणारा नेहरू हा कसला आदर्श असू शकतो ? बालकांनी उद्या मोठे होऊन या चाचा सारखी चाटुगिरी करावी त्यासाठी आदर्श का ? सिगारेट ओढावी आणि इतरांनाही सिगारेट ओढण्यासाठी मदत करावी याचा आदर्श घ्यायचा का ? दुस-याच्या बायको समोर लाळघोटेपणा करण्याचा आदर्श का ? की कोणतीही नितीमत्ता न ठेवता लफडी करण्याचा आदर्श ? 
नेहरू हा फारच रंगेल माणूस होता हे वारंवार वाचनात येत आहे, त्याचा रंगेलपणाची छायाचित्रे उपलब्ध आहेत …त्याचा छातीला गुलाब असायचे पण मनात गजरा असायचा ….छातीला असणारे गुलाबच त्याच्या रंगेलपानाची साक्ष देते ….    त्यावरून तो चाचा किंवा चाचू नेहरू नाही तर चाटू नेहरू होता हे उघड होतेय … मग अशा चाटूचा वाढदिवस बालकदिन म्हणून साजरा करणे कितपत योग्य ????
माणूस जेव्हाडा मोठा होतो तेव्हढ्या जबाबदारीने त्याने वागले पाहिजे … तेव्हडी त्याकडून नैतिकतेची अपेक्षा असते नैतिकता हा सर्वात महत्वाचा गुण अंगी असणे आवश्यक आहे पण त्याचीच कमी कॉंग्रेसने निर्माण केलेल्या आदर्श्यांकडे आहे … !!!!!! ( येथे या माणसांचा एकेरीत उल्लेख केलाय त्यामुळे काहींना वाईट वाटेल , राग येईल मला काही आदर बिदर नाही का असा प्रश्न पडेल पण मी माणसांचा आदर त्यांच्या चारित्र्य, नितीमत्ता, बुद्धीमत्ता या अश्या सद्दगुणांनुसार करतो , नुसता वयाचा नि नाव मोठे असल्यानेच आदर करायचा झाला तर लादेन, दाउद यांचाही आदर करावा लागेल … !!!!)

Saturday, October 12, 2013

Wednesday, October 9, 2013

Thursday, September 12, 2013

साराच महासट्टा !!!!


भारत महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत आहे … दळभद्री सरकार … दिवाळखोर विरोधक आणि आंधळी मुकी बहिरी भेकड जनता यांच्या जोरावर महासत्ता ?…. या देशाचा सारा कारभार रामभरोसे …असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ही साऱ्यांचीच अंधश्रद्धा ….! इथे संपत्तीची देवेता लक्ष्मि पण रुपयाची पत घसरत चाललीय …. इथे विध्येची देवेता सरस्वती, बुद्धीचा देव गणपती पण जगातल्या पहिल्या २०० विद्यापीठात भारतातील एकही नाही …. जी सहाशे पर्यंत यादीत चार पाच विध्यापीठे आहेत त्यांचे नाव गेल्या वर्षी पेक्षा यादीत घसरले …. कसे होणार या देशाचे ???? ना आर्थिक सुबत्ता ना शैक्षणिक गुणवत्ता …. साराच महासट्टा !!!!

Tuesday, August 20, 2013

हजारो दाभोलकर मेले तरी चालतील पण आम्ही सुधारणार नाही

खरे तर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्तेचे खरे कारण उघड होणे आहे  । मारणारे हात सापडले तर लक्षात येईल  की टोपी खाली काळे डोके कुणाचे आहे … पण एक मात्र खरे की …. नरेंद्र दाभोलकरांची हत्या ही परंपराच आहे… जो आमच्या सडलेल्या चालीरीती विरुद्ध बोलेले, जुनाट धार्मिक कर्मकांड बंद करण्याची भाषा करेल] आमच्या सडलेल्या रूढी परंपरांच्या विरुद्ध आवाज  काढेल, आमच्या कर्मठपणाबद्दल बोलेल  त्याला असेच मरावे लागेल …जोतीबा, बाबासाहेब यांच्यावर हल्ले झाले … तुकारामाला सदेह वैकुंठात पाठविले गेले … अनेक उदाहरणे आहेत … दाभोलकरांनी तशीच काहीशी चूक केली ( त्यांची आणि जोतीबा , बाबासाहेब, तुकारामांची बरोबरी नाही होऊ शकत , केवळ परंपरा सांगण्यासाठी … ) त्यांनी चालवलेला लढा हा यांची दुकानदारी बंद करणार होता … मग आमच्या ढेर पोटांचे कसे …. बहुजनांना लुटण्याच्या धंद्याचे कसे ???  
माणूस मारून विचार मारता येत नाहीत हे जरी खरे असले तरी विचारांची गती थांबते … कारण आजचा समाज हा शिक्षणामुळे भेकड झालेल्या डोक्यांचा आहे … मरु देत … कुणीही  … आपल्याला त्या भानगडीत पडायचे नाही … मी माझी बायको … बाल्या आणि बाली … आणि दहा बाय दहाची खोली … बस !!! असा भेकड समाज मारण्याच्याच लायकीचा आहे … पण त्याला वाचाविण्यासाठी निघालेल्यांचे दाभोलकर होतात …। त्यामुळेच माणूस मारला की विचाराची गती थांबते हे सत्य स्वीकारावेच लागेल … शिकून भेकड बनलेल्यानी आणि बुद्धी कुणा तरी बाबा, बुवा, पुजा-याच्या पायावर गहान ठेवालेल्यांनी  कृपया दाभोलकरांना श्रद्धांजली वाहू नये बस एव्हडी मरणोत्तर कृपा त्यांच्यावर करावी … 
 महाराष्टाच नव्हे तर सा-या देश भर हा दहशदवाद आहे … आम्ही पाकिस्तान आदि देशांना दहशदवादी म्हणतो पण आपल्यातच दहशदवादी दिसतात … त्यांचे काय ? महाराष्ट्रात संतांचे, शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेतल्याशिवाय राज्य   करता येत नाही  म्हणून त्यांचे नाव घेतले जाते नाहीतर त्यांचे विचार वेशिलाच टांगलेले दिसतात … त्यामुळेच दाभोल्कारांसारखे रस्त्यात मरतात … सरकारने या तांत्रिक मांत्रिक धार्मिक दहशद्वाल्यांना पोसलेले आहे … त्यामुळे असे हजारो दाभोलकर मेले तरी चालतील पण आम्ही सुधारणार नाही आणि बहुजनांना सुधारुही देणार नाही अशीच सरकारची कृती  दिसते …. आता सरकार जादू टोणा विरोधी कायदा करेल त्याला दाभोलकरांचे नाव देईल आणि मग त्यांच्या  टाळूवरचे लोणी खाईल …. 

Thursday, August 15, 2013

दिल ही छोटासा छोटीसी आशा 


Tuesday, March 19, 2013

आयुष्यभर जेव्हडे पिले आणी सोडले तेव्हडे एका दिवसात काही मिनिटात वाया घालवले


माणूस दिवसाला सरासरी १.५ लिटर लघवी करतो , याचा अर्थ  तो ७ २ वर्षाचा होई पर्यंत ३ ९ ४ २ ० लिटर अनावश्यक पाणी लघवी च्या माधमातून बाहेर टाकतो वयाची ७ २  वर्ष पार केलेल्या या बापूने एका कार्यक्रमातच एव्हडे पिण्यायोग्य पाणी वाया  घालवले …मुंबईतल्या कार्यक्रमातही हजारो लिटर पाणी वाया घालवले …त्याचा अधिकृत आकडा  माहित व्हायचा आहे …. माणूस दिवसाला सरासरी ५ लिटर पाणी पितो म्हणजे १ ३ १ ४ ० ०  लिटर  पाणी  तो ७ २ वर्षाचा होई पर्यंत पितो …. नागपूर आणि मुंबई मधला आकडा मिळवला तर बापूने आयुष्यभर जेव्हडे पिले आणी सोडले तेव्हडे एका दिवसात काही मिनिटात वाया घालवले …. मग विचार आपल्या मनाला … कसे हानावे या बापूला ….